English

सुदर्शन भारत सेवा फाउंडेशन

प्रकाशने

आरोग्यविषयक जनजागृती • १२ पुस्तिका

कॅन्सरविषयक जनजागृती : बारा पुस्तिकांची ग्रंथमाला

भीती नको. योग्य माहिती, वेळेत तपासणी आणि योग्य निदान हवे. बारा पुस्तिकांच्या ग्रंथमालेसाठी हा स्वतंत्र विभाग आहे.

छापील प्रत • पुस्तिका ०१

पहिली पुस्तिका घरपोच मागवा

कॅन्सर समजून घेऊ या… · मराठी पुस्तिकेची एक छापील प्रत

पुस्तक ₹३५ + कुरिअर ₹४०एकूण ₹७५

१. QR स्कॅन करून ₹७५ भरा

UPI ॲपमध्ये ₹७५ रक्कम स्वतः भरा. या QRमध्ये रक्कम आधीपासून भरलेली नाही.

पहिल्या पुस्तिकेसाठी संस्थेचा पेमेंट QR

दिलेल्या QRमधील पैसे स्वीकारणाऱ्याचे नाव
SUDARSHAN CANCER HOSPIT

या QRमध्ये संस्थेचे पूर्वीचे नाव आहे. पैसे भरताना पेमेंट ॲपमध्ये दिसणारे प्राप्तकर्त्याचे नाव तपासा.

QR सेव्ह करा

याच मोबाईलवर वेबसाइट पाहत आहात? QR सेव्ह करा आणि सेव्ह केलेली प्रत स्कॅन करण्याची सुविधा असलेल्या UPI ॲपमध्ये गॅलरीतून निवडा.

२. पैसे भरल्यानंतर पत्ता WhatsAppवर पाठवा

खालील तपशील भरा. +91 97664 23325 या क्रमांकावर पाठवण्यासाठी WhatsAppमध्ये संदेश उघडेल. तो तपासून पाठवा.

हे तपशील वेबसाइटवर साठवले जात नाहीत. तुम्ही WhatsApp संदेश पाठवल्यावर ते संस्थेला मिळतील.

पेमेंटचा स्क्रीनशॉट असल्यास WhatsAppमध्ये जोडा. संस्थेच्या खात्यात पैसे जमा झाल्याची खात्री केल्यानंतर ऑर्डर निश्चित करून पुस्तक पाठवले जाईल.

एकापेक्षा जास्त प्रती किंवा भारताबाहेर पुस्तक पाठवायचे असल्यास पैसे भरण्यापूर्वी संपर्क करा. अधिक प्रतींसाठी चौकशी करा

वृत्तपत्र प्रसिद्धी

तरुण भारत · आमचं पुणे · पान २ ·

विजयादशमी उत्सवात ‘कॅन्सर समजून घेऊया’ पुस्तिकेचे निःशुल्क वितरण

सुदर्शन भारत सेवा फाउंडेशनच्या बारा पुस्तिकांच्या कर्करोग जनजागृती ग्रंथमालेतील पहिल्या पुस्तकाच्या निःशुल्क वितरणाची बातमी तरुण भारतच्या पुणे आवृत्तीत प्रसिद्ध झाली आहे. पुणे महानगरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध विजयादशमी उत्सवांमध्ये ही पुस्तिका वितरित करण्याचे नियोजन बातमीत नमूद आहे.

कर्करोगाची प्राथमिक ओळख, त्याविषयीचे गैरसमज, वेळेत तपासणीचे महत्त्व आणि योग्य उपचारांची आवश्यकता यांची सोप्या भाषेत माहिती पोहोचवणे हा उपक्रमाचा उद्देश आहे.

संघाचे पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले यांनी स्वयंसेवकांना पुस्तिका घेऊन वाचण्याचे आणि त्यातील माहिती कुटुंबीयांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले आहे. पुस्तिकेची सुधारित डिजिटल प्रत येथे वाचण्यासाठी उपलब्ध आहे.

या पुस्तिकेला पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह मा. डॉ. प्रवीणजी दबडघाव यांची प्रस्तावना लाभली आहे.

तरुण भारत, आमचं पुणे, पान २, २० ऑक्टोबर २०२६: सुदर्शनच्या पुस्तिकेच्या निःशुल्क वितरणाची ई-पेपरमधील बातमी
ई-पेपरमधील कात्रण · आमचं पुणे, पान २ · २० ऑक्टोबर २०२६. मोठे पाहण्यासाठी चित्रावर क्लिक करा.

पुढील पुस्तिकांची नावे पहिल्या पुस्तिकेतील ग्रंथमालेच्या यादीप्रमाणे दिली आहेत. त्यांच्या PDF पुढील टप्प्यात जोडल्या जातील.

  1. 02आपल्या सवयी, आपले आरोग्यपुढील टप्प्यात
  2. 03वेळेत तपासणी, योग्य निदानपुढील टप्प्यात
  3. 04निदान झाले आता पुढे काय?पुढील टप्प्यात
  4. 05उपचारांचा प्रवास समजून घेताना…पुढील टप्प्यात
  5. 06उपचार काळातील आहार आणि शरीराची काळजीपुढील टप्प्यात
  6. 07मनाला आधार, जगण्याला दिशापुढील टप्प्यात
  7. 08रुग्णासोबत उभे राहणारे कुटुंबपुढील टप्प्यात
  8. 09उपचारांची आर्थिक तयारी आणि मदतीचे मार्गपुढील टप्प्यात
  9. 10वेदना कमी, जीवनाला सन्मानपुढील टप्प्यात
  10. 11उपचारानंतरचे जीवनपुढील टप्प्यात
  11. 12जागरूक समाज, सक्षम आरोग्यसेवापुढील टप्प्यात

शिक्षण • प्रोत्साहन • समाजसेवा

सुदर्शन विद्यार्थी प्रेरणा पुरस्कार–२०२६

दहावीत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या ५५ विद्यार्थ्यांचा गौरव. ३० ऑगस्ट २०२६ रोजी बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे झालेल्या कार्यक्रमाचा वृत्तांत, छायाचित्र, व्हिडिओ आणि वृत्तपत्र प्रसिद्धी पाहा.

पुरस्कार सोहळा पाहा
पुरस्कारप्राप्त विद्यार्थी आणि कार्यक्रमातील मान्यवर

कार्यसंग्रह व संस्थेची इतर प्रकाशने

संस्थेची माहिती, उपक्रमांचा दस्तऐवज आणि निवडक वृत्तपत्रीय नोंदी एकाच ठिकाणी. मूळ कागदपत्रे मराठीत उपलब्ध आहेत.

माध्यमांतील नोंदी