English

सुदर्शन भारत सेवा फाउंडेशन

संचालक मंडळ

आरोग्यसेवा आणि समाजकार्याला दिशा देणारे आमचे सहकारी.

संचालकांचे मनोगत

“यशस्वी व्यावसायिक म्हणून ओळख मिळवणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर संवेदनशील, सहृदय आणि समाजाला काहीतरी परत देणारा माणूस म्हणूनही मला ओळखले जावे, अशी माझी इच्छा आहे.

मी समाजासाठी काय केले, माझ्या शहरासाठी काय केले आणि देशासाठी काय योगदान दिले, या प्रश्नांची उत्तरे माझ्या कृतीतून मिळावीत, असे मला वाटते. आपल्या प्रगतीसोबत इतरांच्या आयुष्यातही सकारात्मक बदल घडवता आला, तर त्या यशाला अधिक अर्थ प्राप्त होतो.

सुदर्शन भारत सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून हीच भावना प्रत्यक्ष सेवाकार्यात उतरवण्याचा माझा प्रयत्न आहे. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत गरजूंच्या पाठीशी उभे राहणे आणि आपल्या क्षमतेनुसार योगदान देत राहणे, यालाच मी माझ्या वाटचालीचा महत्त्वाचा भाग मानतो.”

योगेश देशपांडे
संचालक, सुदर्शन भारत सेवा फाऊंडेशन

योगेश अंबादास देशपांडे

संचालक

डॉ. अनंतभूषण रानडे

कर्करोगतज्ज्ञ व वैद्यकीय सल्लागार

धनंजय जोशी

संचालक

एस. आर. कुलकर्णी

संचालक

अरुण कुलकर्णी

नामनिर्देशित संचालक

सुहास जोशी

संचालक

ॲड. सुजय जोशी

विधी सल्लागार

मार्गदर्शन आणि वैद्यकीय साथ

वैद्यकीय कर्करोगतज्ज्ञ

मार्गदर्शक : डॉ. अनंतभूषण रानडे

डॉ. रानडे यांनी २०१५–१६ या काळात Indian Society of Medical and Paediatric Oncology (ISMPO)चे अध्यक्षपद भूषवले. वैद्यकीय कार्यासोबत संशोधन आणि लेखनातही त्यांचा सहभाग आहे.

संस्थेशी जोडलेले नाते

१८ जून २०२३ रोजी संस्थेच्या प्रारंभप्रसंगी त्यांनी “सुदर्शन” या नावामागील सुदर्शन चक्राची संकल्पना मांडली. त्यांच्या नि:शुल्क सल्ल्यासाठी संस्थेमार्फत भेटीचा समन्वय केला जातो.

नि:शुल्क तज्ज्ञ सल्ला

भेटीची वेळ व ठिकाण आधी संस्थेमार्फत निश्चित करा. तपासणी, औषधे आणि पुढील उपचार यांचा खर्च स्वतंत्र असू शकतो.

व्यावसायिक परिचय : Avinash Cancer Clinic ↗

परिचयाचे मूळ माहितीपत्रक पाहा
डॉ. अनंतभूषण रानडे : परिचय व संस्थेशी नाते
डॉ. अनंतभूषण रानडे : परिचय व संस्थेशी नाते